जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ (JMI) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त बीबीसी वृत्तपट दाखवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियासंबंधित (FSI) जामिया मिलिया इस्लामियाच्या चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. या अटकेला विरोध करण्याऱ्या ७०हून अधिक विद्यार्थ्यांना बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान याबाबत पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनही आली नाही.
माहितीनुसार, बुधवारी जामिया विद्यापीठाच्या गेटजवळील वर्ग बंद ठेवण्यात आले आणि रॅपिड अॅक्शन फोर्ससह पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. मोदींवरील बीबीसीचा वृत्तपट दाखवण्याची वेळी संध्याकाळी ६ वाजता ठेवण्यात आली होती. पण तत्पूर्वी चार विद्यार्थ्यांना अटक केल्यामुळे इतर विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी या अटकेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमले. मात्र दिल्ली पोलिसांनी लगेचच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. याबाबतची माहिती एसएफआयच्या दिल्ली राज्य समितीचे सचिव प्रीतीश मेनन यांनी दिली आहे.
जेएनयूमध्ये झाला होता मोठा गदारोळ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कॅम्पसमध्ये वादग्रस्त बीबीसी वृत्तपट पाहताना अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक झाली होती. हा वृत्तपट दाखवण्यास विद्यापीठाकडून नकार दिला असतानाही जेअनयूच्या अध्यक्षांनी माघारी घेतली नाही. जेएनयूमधील कॅम्पसमध्ये रात्री ९ वाजता बीबीसी वृत्तपट दाखवण्यात येणार होता, पण रात्री साडे आठ वाजता अचानक संपूर्ण जेएनयू कॅम्पसमधील वीज बंद करण्यात आली.
(हेही वाचा – इस्रोचा पराक्रम; यान कधीही बनणार क्षेपणास्त्र)
Join Our WhatsApp Community