कोरोनासोबतच नोरोव्हायरसचे सावट! भारतात आढळले दोन रुग्ण; अशी घ्या काळजी

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा धोका कायम असताना आता नोराव्हायरस या नव्या आजाराने नागरिकांची धास्ती वाढवली आहे. भारतात केरळमधील विझिंजममध्ये नोरोव्हायरसचे (Norovirus) दोन रुग्ण आढळले आहेत.

( हेही वाचा : कॉफी मशीनचा शोध लावणाऱ्या अँजेलो मोरिओन्डोसाठी Google ने साकारले अनोखे Doodle!)

केरळमधील अल्पुज्जा जिल्ह्यातील कायाकुलम या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन केल्यानंतर अचानक ८ मुलांची तब्येत बिघडली. त्यानंतर या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान दोन मुलांना नोरोव्हायरची लागण झाल्याचं समोर आले असून या मुलांचे नमुने खासगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नोरोव्हायरस हा अस्वच्छतेमुळे अधिक पसरू शकतो. यामुळेच या व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वच्छता व साफसफाई आवश्यक आहे.

आरोग्यमंत्र्यांचे आवाहन 

नमुने गोळा करण्यात आले असून त्याची तपासणी सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग तातडीने उपाययोजना करत असून राज्यातील नागरिकांनी चिंता करू नये असे आवाहन केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी केले आहे. नोरोव्हायरस या आजारावर मात करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

नोरोव्हायरस म्हणजे काय?

नोरोव्हायरस प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला जाणारा व्हायरस आहे. यामुळे पोटातील गॅस्ट्रोइंटेस्टीनल आजार होऊ शकतो. दूषित जागेच्या संपर्कात आल्यामुळे किंवा दूषित अन्न पोटात गेल्यामुळे या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्याशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा नोरोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

नोरोव्हायरसची लक्षणे

  • उलटी किंवा मळमळ, पोटदुखी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी
  • जंतुनाशक या व्हायरसला पूर्ण नष्ट करत नाही.
  • ६० अंश तापमानात हा व्हायरस जिवंत राहू शकतो.
  • हॅंड सॅनिटायझरचा वापर करूनही हा व्हायरस जिवंत राहू शकतो.

उपाययोजना

  • नोरोव्हायरसपासून बचाव करण्यासाठी पाणी भरपूर पिणे.
  • कोमट पाण्याने हाथ वारंवार धुणे.
  • साफ-सफाई करणे.
  • प्राण्यांशी संपर्क येणार नाही काळजी घेणे.
  • ताचे अन्न खा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here