गोवरच्या रुग्णांसाठी सेव्हन हिल्समध्ये १०० खाटांची सुविधा

154

मुंबईत मागील काही दिवसांपासून बालकांमध्ये गोवरची साथ मोठ्याप्रमाणात पसरली असून या आजाराला प्रतिबंध  करण्यासाठी घरोघरी भेटी देत बालकांची पाहणी केली जात आहे. यामध्ये ज्या बालकांची प्रकृती चिताजनक असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कस्तुरबासह राजावाडी, गोवंडी शताब्दी, गोवंडी प्रसुतीगृह, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात काही कक्ष निर्माण करण्यात आले आहे.  मात्र, या रुग्णालयांमध्ये आणखी एका रुग्णालयाची भर पडली असून कोविडच्या काळात ज्या रुग्णालयाने महत्वाची भूमिका बजावली, त्या कोविड स्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळख निर्माण झालेल्या मरोळ येथील सेव्हन  हिल्स रुग्णालयामध्ये  १०० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईत गोवरची साथ मोठ्याप्रमाणात पसरल्यानंतर एम पूर्व विभागांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३३७८ संशयित रुग्ण असून त्यातील आतापर्यंत  २२० निश्चित  रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता  ३२ लाख ३३ हजार  ०६८ घरांची तपासणी केली असून मंगळवारी २ लाख ९७ हजार ०७४ तपासणी करण्यात आली होती. यामध्ये मंगळवारी ताप आणि अंगावर पुरळ उठलेले १७० बालके आढळून आली.

गोवरच्या वाढत्या साथीच्या आजारामुळे प्रारंभी कस्तुरबा रुग्णालयांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी कक्ष  निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता गोवंडी शताब्दी अर्थात पंडित मदन मोहन रुग्णालय आणि गोवंडी प्रसुतीगृहांमध्ये बाल रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कक्ष निर्माण करण्यात आले. याशिवाय राजावाडी रुग्णालय, कांदिवली शताब्दी अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आता कोविड स्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये ५०खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली  आहे. त्यामुळे ज्या बालकांची प्रकृती चिंताजनक असेल त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, गोवरच्या आजार रोखण्यासाठी ९ महिने ते पाच वर्षांमधील बालकांना गोवरची लस त्वरीत देण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने  केले आहे. महापालिकेच्या यासर्व रुग्णालयांमध्ये ३१६ खाटा यासाठी राखीव असून त्यातील ११४ खाटांवर रुग्ण दाखल आहेत तर २०२ खाटा या रिकाम्या आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये १०० खाटा या ऑक्सीजच्या राखीव आहेत.  त्यामध्ये १० खाटा या अतिदक्षता विभागाच्या तर दहा खाटा या व्हेंटीलेटरच्या आहेतअसल्या तरी अद्याप एकाही बालकाला दाखल करण्यात आले नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

सेव्हन हिल्स रुग्णालयांने कोविड काळात विशेष कामगिरी बजावली. त्यामुळे या रुग्णालयाची ओळख ही कोविड स्पेशालिटी रुग्णालय म्हणून निर्माण झाली होती. या रुग्णालयांमध्ये कोविडचे ४९ हजार ८५१ रुग्ण दाखल झाले होते आणि त्यातील ४४ हजार ७७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.