राष्ट्रवादीचा नगरसेवकच निघाला चंदनतस्कर, अखेर गुन्हा दाखल

122

बीडमधील केज येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये नुकताच नगरसेवक बनलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चंदन तस्करीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात केज नगरपंचायतीचा नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब जाधव यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असं आहे प्रकरण

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांच्या शेतातून बाळासाहेब दत्तात्रय जाधव हा बेकायदेशीररित्या चंदनाची झाडे तोडायचा. या कामासाठी तो काही काही इसमांना एकत्र जमवून या परिसरातील चंदनाच्या झाडांची छाटणी करायचा. ती तोडलेली झाडं देवराव कुंडगर याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तासून, त्यातील चंदन काढून पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून शेडमध्ये ठेवायचा अशी माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – भिवंडीत अग्नितांडव! भीषण आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक)

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापा मारला असता एक इसम जागीच सापडला तर या ठिकाणच्या पत्र्याच्या शेडमध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये 27 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाभा आढळला. त्याची किंमत 67 हजार 500 रुपये असून त्या ठिकाणी 10 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, देवराव कुंडगर याला हा माल कोणाचा आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, हा माल बाळासाहेब दत्तात्रय जाधव याचा असल्याचे त्याच्याकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.