कुर्ला पूर्व कासाईवाडा येथून मोठ्या प्रमाणात गोमांसची बेकायदेशीररित्या तस्करी करण्यात येते. रविवारी पहाटेच्या सुमारास तस्करांचा पाठलाग करून कारवाई करण्यासाठी गेलेल्या चुनाभट्टी पोलीस आणि ध्यान फाउंडेशनच्या स्वयंसेवकावर येथील तस्करांनी लाठ्या काठ्या, शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात २ स्वयंसेवक आणि एक पोलीस अंमलदार जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीसांनी २० ते २५ जणांच्या जमावावर हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना ताब्यात घेऊन इतरांची धरपकड सुरू केली आहे.
तस्करीमागे खूप मोठे रॅकेट
राज्यात गोमांसवर बंदी असतांना मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात गोमांसची बेकायदेशीर तस्करी करण्यात येत आहे. या तस्करीमागे खूप मोठे रॅकेट काम करीत आहे. गोमांस तस्करीचा केंद्रबिंदू ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तर मुंबईतील कुर्ला पूर्व कसाई वाडा असल्याचे सांगितले जात आहे. येथून मोठ्या प्रमाणात गोमांसची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे अनेक वेळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत देखील उघडकीस आलेले आहे.
(हेही वाचा – )
असा घडला प्रकार
कुर्ला पूर्व कसाई वाडा या ठिकाणाहून रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणात गोमांसची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती ‘ध्यान फाउंडेशन’ या संस्थेच्या स्वयंसेवकाना मिळाली होती. या संस्थेने चुनाभट्टी पोलिसांना याबाबतची सूचना देऊन संस्थेने कारवाईसाठी पोलीसांच्या मदत घेतली. पोलिसांची तुटपुंज्या मदतीने संस्थेच्या स्वयंसेवक यांनी पोलीस वाहनातून गोमांसने भरलेल्या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी या टेम्पोचा थांबवण्याचा इशारा करून देखील हा टेम्पो थांबत नव्हता पोलिसांनी या टेम्पोचा पाठलाग सुरू केला असता आपल्यामागे पोलीस लागल्याचे कळताच टेम्पो चालकाने इतर तस्करांना सूचित केले. काही अंतरावर रोड ब्लॉक करून टेम्पो थांबला असता पोलीस आणि ध्यान फाऊंडेशन या स्वयंसेवकानी बाहेर येऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करतात एका बाजूने २० ते २५ जणांचा जमाव हातात लाठ्या, काठ्या व शस्त्र घेऊन पोलिसांच्या दिशेने आले व त्यांनी पोलीस आणि स्वयंसेवकावर हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांवर हल्ला होत असल्यामुळे ताबडतोब पोलिसांची अधिक फोज घटनास्थळी दाखल झाली.
८ जण ताब्यात इतरांची धरपकड सुरू
पोलिसाचा ताफा बघून हल्लेखोर तेथून फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या ध्यान फाऊंडेशनचे स्वयंसेवक आशिष बारीक यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या हल्ल्यात पोलीस किरकोळ जखमी झाले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या चुनाभट्टी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले असून त्याचे काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी २० ते २५ जणावर हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना ताब्यात घेऊन इतरांची धरपकड सुरू केली आहे.