दर महिन्याच्या सुरूवातीला इंधन कंपन्यांकडून उत्पादनांचे नवे दर जाहीर केले जातात. गेल्या महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ३६ रूपयांनी कमी केले होते. मात्र याचा फायदा घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना झाला नव्हता. परंतु ऑक्टोबरमहिन्यापासून सीएनजी आणि एलपीजीच्या दरात बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून LPG आणि CNG च्या किमती वाढणार की कमी होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
(हेही वाचा – रेशन कार्ड धारकांना सरकारकडून दिलासा! आता FREE मिळणार LPG सिलिंडर)
दरम्यान, गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. त्यामुळे यंदा सणा-सुदीच्या पार्श्वभूमीवर सरकार १४ किलोच्या सिलिंडरच्या दरात कपात करू शकते, अशी अपेक्षा आहे.
LPG सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर इंडियन ऑईलकडून एलपीजीचे नवीन दर जारी करण्यात आले, त्यानुसार, इंडेन सिलिंडर दिल्लीत ९१.५० रूपयांनी, कोलकत्यात १०० रूपयांनी, मुंबईत ९२. ५० रूपयांनी आणि चेन्नईमध्ये ९६ रूपयांनी स्वस्त झाला होता. हा बदल फक्त व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आला होता. तर १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर फक्त जुलै महिन्याच्या दराने उपलब्ध आहे. प्रत्यक्षात जुलैमध्ये LPG सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती.