मध्यप्रदेशच्या मुरैना येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये बेळगावच्या जवानाला वीरमरण आले. गणेशपूर येथील विंग कमांडर हणमंतराव रेवणसिद्दप्पा सारथी या वैमानिकाचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मध्यप्रदेश येथील मुरैना येथे सरावादरम्यान हे विमान कोसळल्याने हा अपघात घडला.
भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 व मिराज-2000 ही दोन विमाने शनिवारी सकाळी सरावादरम्यान कोसळली. एक विमान मोरैना येथे कोसळले तर दुसरे राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले. ग्वाल्हेर येथील एअरबेसवरुन ही विमाने सरावासाठी निघाली होती, परंतु तांत्रिक बिघाड झाल्याने विमाने कोसळली. यामध्ये दोन पायलट जखमी झाले तर एका पायलटचा मृत्यू झाला आहे.
( हेही वाचा: ‘मला हिंदू म्हणा’, केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांचं विधान )
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
हणमंतराव सारथी यांचे संपूर्ण कुटुंबच भारतीय सैन्य व वायुदलात आहे. त्यांचे वडिल रेवणसिद्दप्पा हे भारतीय सैन्यातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे भाऊ रवी सारथी हे एअरफोर्समध्ये वैमानिक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव रविवारी विशेष विमानाने बेळगावला आणले जाणार असून, त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community