ऐकावं ते नवलंच! भारत फिरायला आलेल्या बेल्जियम मुलीचे कर्नाटकच्या मुलाशी जुळले प्रेम केले लग्न!

168
लग्नाच्या जोड्या वरती देवाकडे बांधलेल्या असतात, अशी म्हण आहे, पण यथार्थ सत्य आहे, असा अनुभव कर्नाटकातील अनंतराजू याने घेतला आहे. पट्ट्याच्या प्रेमात थेट बेल्जियमची मुलगी प्रेमात पडली आणि तिच्यासोबत लग्नही उरकले आहे.

असा झाला विवाह!

नुकतेच बिहारच्या एका इंजिनिअरने इंग्लंडहून आलेल्या मुलीशी लग्न केले आणि तिला भारतात बोलावले. आता कर्नाटकमधून एक प्रकरण समोर आले आहे. एका ऑटो चालकाने बेल्जियमच्या मुलीशी लग्न केले. हे प्रकरण कर्नाटकातील विजयनगर इथल्या एका ऑटो चालकाचे आहे. सोशल मीडियावर दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले. सोशल मीडियावर त्यांची आधी मैत्री झाली, त्याची मैत्री हळूहळू फुलत गेली. 30 वर्षीय अनंतराजू हा एका ऑटो चालकासोबत टुरिस्ट गाईड म्हणून काम करत होता आणि ही मुलगी आपल्या कुटुंबासमवेत आपल्या बेल्जियम या देशात राहते. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले. वर्ष 2019 मध्ये कॅमिल आपल्या कुटुंबासह हम्पी, कर्नाटक येथे फिरायला आली होती. मग अनंतराजू त्यांचे मार्गदर्शक बनले. अनंतराजू यांनीच त्यांना कर्नाटकात फिरवून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मुलगी आपल्या देशात गेली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचाही संपर्क आला. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, मुलीने या रिक्षाचालकाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि होकारार्थी उत्तर मिळाले. कॅमिल आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह थेट भारतात पोहोचली. मंदिरात जाऊन तिने थाटामाटात लग्न केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.