उन्हाळा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला महिना सुरू होतो तेव्हा हवामानात वेगाने बदल होतात. कडाक्याची थंडी कमी झालेली असते आणि हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली असते. अशावेळी या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला बरेच बदल करावे लागतात. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते. पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीला कडूनिंबाचा पाला लावला जातो.
( हेही वाचा : नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण १५ दिवसांत आणणार; उदय सामंत यांची सभागृहात ग्वाही)
- त्वचेसाठी फायदेशीर कडूनिंब जंतुघ्न असल्याने कोणत्याही त्वचाविकारात कडूनिंबाच्या पाल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी अंगावर घेतल्यास त्वचाविकार दूर होण्यास मदत होते.
- कफ आणि उष्णतेच्या विकारांवर उपयुक्त कडूनिंबाची चव अतिशय कडू असते. बदलत्या हवामानात सर्दी-कफाचे विकार वाढतात. आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये कडूनिंबाचा वापर केला जातो. तसेच कडूनिंब शीत प्रकृतीचा असल्याने उष्णतेच्या विकारांसाठीही कडूनिंब पोटात घेणे फायदेशीर ठरते. यामुळे उष्णतेचे विकार नियंत्रणात येण्यास मदत होते.
- रक्त शुद्धीसाठी उपयुक्त रक्ताशी निगडीत समस्या असल्यास कडुलिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. कडूनिंब हा रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने रक्तशुद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
- महिलांमध्ये केस गळणे, केसांत कोंडा होणे, उवा किंवा लिखा होणे अशा समस्या उद्भवतात. त्यावरही कडूनिंब उपकारक ठरते.