Benelli 402S : बेनेलीची नवीन ‘सिटी क्रूझर’ भारतात दाखल

Benelli 402 S : बेनेली कंपनीची ही बाईकमध्ये इंधनाची टाकी तब्बल १६ लीटरची आहे

139
Benelli 402S : बेनेलीची नवीन ‘सिटी क्रूझर’ भारतात दाखल
Benelli 402S : बेनेलीची नवीन ‘सिटी क्रूझर’ भारतात दाखल
  • ऋजुता लुकतुके

बेनेली (Benelli 402S) या इटालियन बाईक मेकर कंपनीने २०१७ मध्ये जगभरात टीएनटी ३०० या जुन्या बाईकचं उत्पादन बंद करून ३०२एस ही नवीन बाईक रस्त्यावर आणली. फ्लुरोसंट ग्रीन या नवीन रंगात आणलेल्या या बाईकला कंपनीने कौतुकाने बेनेली स्ट्रीटफायटर म्हटलं होतं ३०० सीसी क्षमतेची ही बाईक २०२१ मध्ये भारतात आली आणि अल्पावधीत लोकप्रियही झाली. आता कंपनीने नवीन ‘सिटी क्रूझर’ बाईक बाजारात आणली आहे. नावाप्रमाणेच ४०० सीसी क्षमतेची ही गाडी असून यात १६ लीटरची मोठी इंधनाची टाकी आहे.

(हेही वाचा- Gadchiroli येथे १२ माओवादी ठार; CM Eknath Shinde यांच्याकडून पोलिसांचे विशेष कौतुक)

जुलै महिन्यात भारतीय बाजारपेठांमध्ये नवीन बेनेली ४०२एस (Benelli 402S) ही बाईक दिसू लागेल. आधीच्या टीएनटी गाडीच्या मानाने या बाईकमध्ये बरेच बदल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेड आणि टेल लँपसाठी आधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. हँडलवरील सेमी डिजिटल डिस्प्ले जाऊन आता पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले आला आहे. ४०२ सीसी क्षमतेचं ट्विन इंजिन या गाडीत आहे. त्यातून ३८पीएस ऊर्जा निर्मिती होऊ शकते. गाडीचं मायलेजही २३ किमी प्रती लीटर असं सुधारलेलं आहे. आधीच्या १४ लीटरच्या इंधनाच्या टाकीच्या तुलनेत नवीन बाईकमध्ये १६ लीटरची टाकी आहे. (Benelli 402S)

 २०१७ पासून भारतातील बेनेलीचे चाहते ४०२ एस भारतात कधी लाँच होते याची वाट बघत होते. तशी मागणीही कंपनीकडे होत होती. आता कंपनीने भारतात या गाडीचं उत्पादन सुरू केलं असल्यामुळे इथं ही बाईक उपलब्ध होऊ शकणार आहे. गाडीचं वजन २०९ किलो आहे. या गाडीला डबल डिस्क ब्रेक यंत्रणा बसवण्यात आली आहे. (Benelli 402S)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident : ‘त्या’ 300 शब्दांच्या निबंधाविषयी संतापच; जामीन प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा अहवाल)

४०२एस बेसिक मॉडेलची किंमत २,५०,००० रुपयांपासून सुरू होतेय. या गाडीची स्पर्धा असेल ती बीएमडब्ल्यू जी ३१० आर, केटीएम ३९० ड्यूक आणि होंडा सीबी ३०० आर या बाईकशी. (Benelli 402S)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.