जबरदस्त कल्लाकारी! ‘या’ वेटरला ऑलिम्पिकला पाठवा; एकावेळी वाढतो १६ डोसा प्लेट

125

सोशल मीडियावर बर्‍याचदा अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात हॉटेलिंग विषयीचे व्हिडिओ खूपच आकर्षक असतात. कुणी अत्यंत वेगळ्या शैलीत चपात्या करतो, तर कुणी वेगात अंडी फोडताना दिसतो, कुणाची वाढायची शैली अफलातून असते. काही ढाबे, खाण्याचे स्टॉल्स तर अशा विशिष्ट शैलींमुळेच गाजतात आणि म्हणूनच काही स्टॉल्सभोवती आपल्याला जास्त गर्दी दिसून येते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वेटर आपल्या खास आणि आकर्षक शैलीत डोसे देताना दिसतोय आणि यामुळे तो सर्वांचं लक्ष स्वतःकडे वळवत आहे. महत्वाचे म्हणजे हा व्हिडिओ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केला आहे. त्यामुळे पाहता पाहता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

( हेही वाचा: IRCTC चे चारधाम यात्रा टूर पॅकेज! फक्त ५१ हजारात १० धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी )

महिंद्रांचे ट्वीट काय?

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, “We need to get ‘Waiter Productivity’ recognised as an Olympic sport. This gentleman would be a contender for Gold in that event…” वेटर प्रोडक्टव्हिटी असा शब्दप्रयोग आनंद महिंद्रा यांनी केला आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की यास ऑलिम्पिक खेळाची मान्यता देण्याची गरज आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, डोसा तयार झाल्यावर वेटर येतो आणि प्रत्येक प्लेटवर प्लेट ठेवत जातो. एखादा कुशल दहीहंडी संघ ज्याप्रमाणे थर रचतात तसे थर तो रचत जातो. त्यानंतर हा वेटर बाहेर येतो आणि चमत्कारिकरित्या बाहेर बसलेल्या ग्राहकांना एकेक प्लेट वाढत जातो. हे करत असताना एकही प्लेट सरकत नाही. त्याचं स्वतःवरचं संतुलन जबरदस्त आहे. त्यात आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे या वेटरवर सगळीकडून स्तुतींचा वर्षाव होत आहे. अशा कलेला खरोखरच प्रोत्साहनाची गरज असते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.