वर्ल्ड टूर करायला जाण्यासाठी किंवा कोणत्याही देशात फिरायला जाण्यासाठी काही निवडक ठिकाणांच्या सगळ्या गोष्टी जसे की, तिथे राहण्यासाठी हॉटेल्स, तिथले खाणे-पिणे, फिरणे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण आधी गोळा करतो. मग आपल्या खिशाला जे ठिकाण योग्य वाटते त्या ठिकाणी आपण निघण्याची तयारी करतो.
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे चलन असते. आपल्याकडे रुपया चलनात आहे. अमेरिकेत डॉलर, इंग्लंडमध्ये पौंड, संयुक्त राष्ट्रांमध्ये दिनार, तर चीन येथे येन. असे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे चलन आहेत. काही देशांचे चलन हे आपल्या रुपयांपेक्षा कमी किमतीचे म्हणजेच स्वस्त आहेत तर काही देशांचे चलन हे जास्त किमतीचे म्हणजेच महागडे आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत महागडे पाच देश कोणते ते सांगणार आहोत. तसेच जगातल्या सर्वात महागड्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक येतो तेही सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात.
(हेही वाचा – Aditi Tatkare : कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सज्ज – अदिती तटकरे)
हल्लीच सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या माहितीनुसार जगातल्या सर्वात महागड्या देशांमध्ये पाचव्या क्रमांकावर आयर्लंड हा देश आहे. इथे राहणे सोपे नाही. तसेच चौथ्या क्रमांकावर आहे बहमास. तुम्हाला या देशात जाऊन राहायचं असेल तर तुमच्याकडे मोठा बँकबॅलेन्स असायला हवा.
तसेच तिसरा क्रमांक पटकावला आहे कॅमेन आइसलँड या देशाने. हा जगातील तीन सर्वात महागड्या देशांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवला आहे स्वित्झर्लंडने. या देशात नुसते राहणेच नाही तर खाणे-पिणे आणि फिरणेसुद्धा खूप महाग आहे. इथे फिरायला जाण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये असायला हवेत आणि जगातला सर्वात महागड्या देशाचा मान पटकावला आहे बर्म्युडा या देशाने. या शर्यतीत भारत एकशे अडतीसाव्या क्रमांकावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community