मुंबईतील बेस्टच्या वडाळा आगारातील ४०० कंत्राटी चालक व वाहक शुक्रवारी अचानक संपावर गेले आहेत. कंटात्रदार कंपनीने वेतन वेळेवर न दिल्याने बेस्ट चालक संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.
( हेही वाचा : ‘बेस्ट’मध्ये कंत्राटीकरण नको…औद्योगिक न्यायालयाचे आदेश )
…म्हणून पुकारला कंत्राटी बेस्ट चालकांनी संप
मुंबईतील वडाळा आगारातील भाडेतत्वावरील ४०० बेस्ट बस चालक व वाहकांनी शुक्रवारी हा संप पुकारला. बेस्टचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने कंत्राटी बसचालकांना वेतन वेळेवर न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आणि ते संपावर गेले आहेत.
बेस्टच्या शेकडो एकर जागेवर डोळा
दोन आठवड्यापूर्वी सुद्धा कंत्राटदाराच्या कंत्राटी बसवरील कंत्राटी कामगारांचे वेतन (जवळपास पाच महिन्याचे) वेळेवर न दिल्यामुळे कंत्राटी बस कामगारांनी संप केला होता. बेस्ट चालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बेस्ट कशी फायद्यात येईल हे बघायचे सोडून कॉन्ट्रॅक्टरच्या बस व कंत्राटी कामगार आणून स्वताचे खिसे कसे भरतील यासाठी बेस्ट नुकसान केले. यावरून हे लक्षात येते की, या सत्ताधाऱ्यांचा बेस्ट जगवण्यापेक्षा बेस्ट संपवून बेस्टच्या शेकडो एकर जागेवर डोळा आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांची बेस्ट कधी कामगारांची झाली नाही, मग ती कंत्राटी कामगारांची कशी होईल. असा आरोप भाजपने केला आहे.
Join Our WhatsApp Community