Best Actress In India : बॉलिवुडवर राज्य करणार्‍या टॉप अभिनेत्री, ज्यांनी बदलून टाकली अभिनयाची व्याख्या

बॉलिवुडमध्ये एक काळ होता, जेव्हा नायिका ह्या फक्त शोभेच्या बाहुल्या बनून गेल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीतही काही नायिकांनी आपली छाप पाडली आणि बॉलिवुडवर राज्य केलं.

676
Best Actress In India : बॉलिवुडवर राज्य करणार्‍या टॉप अभिनेत्री, ज्यांनी बदलून टाकली अभिनयाची व्याख्या
पूर्वी बॉलिवुडचे चित्रपट पाहून लोक जगायचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे अमिताभ बच्चनसारखा अँग्री यंग मॅन तयार होऊ शकला. अमिताभने कोणाच्या कानाखाली मारलं, तर प्रेक्षक खुश व्हायचे. कारण त्यालाही कोणालातरी मारावसं वाटतं असतं, पण सामाजिक बंधनांमुळे आणि कायद्यांमुळे तो हे करु शकत नाही. त्याच्या वतीने चित्रपटातील नायक ते करतो. (Best Actress In India)
बॉलिवुडमध्ये एक काळ होता, जेव्हा नायिका ह्या फक्त शोभेच्या बाहुल्या बनून गेल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीतही काही नायिकांनी आपली छाप पाडली आणि बॉलिवुडवर राज्य केलं. तर चला काही टॉपच्या अभिनेत्रींना (best actress in india) भेटूया ज्यांनी निर्माण केलं आपलं अस्तित्व:  (Best Actress In India)
Top Best Actresses in India Who Redefined Bollywood

१. मधुबाला

मधुबाला (Madhubala) ही सर्वात सुंदर भारतीय अभिनेत्रींपैकी एक होती. तिचा जन्म १९३३ ला झाला आणि १९६९ ला तिने ह्या जगाचा निरोप घेतला. तिने १९५० च्या दशकात जवळजवळ चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. ‘मुघल-ए-आझम’ मधील तिचे नृत्य आणि तिची भूमिका प्रचंड गाजली. ‘चलती का नाम गाडी’ मधील तिचा विनोदी अभिनयही लोकांना भावला. ती एक प्रतिभावान आणि सर्वांगसुंदर अभिनेत्री होती. (Best Actress In India)

२. रेखा

एक जबरदस्त अभिनेत्री. अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाला टक्कर देणारी एक आघाडीची अभिनेत्री. तिचा जन्म १९५४ मध्ये झाला. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिची स्तुती झाली नसली तरी नंतर तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करुन दाखवली. सौंदर्याची खाण असली तरी दर्जेदार अभिनयाने तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले. पुढे तिच्या वाटेला अगंभीर स्त्रिवादी भूमिकाही आल्या. ज्यामुळे ती आणखी उजळून निघाली.  (Best Actress In India)

३. माधुरी दीक्षित

माधुरीने (Madhuri Dixit) १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिचं नृत्य कौशल्यं, अभिनयाच्या क्षमतेने तिने प्रेक्षाकांना भारावून टाकले. पडद्यावरची तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आसुसलेले असायचे. धकधक गर्ल अशी ओळख मिळाली असली तरी तिने केवळ सौंदर्याच्या बळावर प्रसिद्धी मिळवली नाही तर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचीच बोटे तिने तोंडात घातली आहेत. (Best Actress In India)
तेजाब, हम आपके है कौन, आणि दिल तो पागल अशा चित्रपटांनी माधुरी दीक्षितला यश मिळवून दिले. तिने सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत.

४. काजोल

बॉलिवुडमध्ये टिकण्यासाठी केवळ गोरा रंग हवा, ही व्याख्या काजोलने (Kajol) बदलली. सौंदर्य तर सावळ्या रंगालाही असतं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, बाजीगर मधील चुलबुली काजोल आणि गुप्त मधील खलनायिका – अशी प्रत्येक भूमिका तिने सक्षमतेने निभावली. विशेष म्हणजे स्लिम अभिनेत्री यशस्वी होतात, ही व्याख्या देखील तिने बदलली सौंदर्य म्हणजे स्वतःच्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग करणे नव्हे हे तिने ठाममध्ये स्वतःच्या उपस्थितीतून दाखवून दिले. सहज-सुंदर अभिनय आणि नैसर्गिक सौंदर्य म्हणजे तिची ताकद.  (Best Actress In India)

 ५. कंगणा राणौत

वेगळेपण म्हणजे काय? तर कंगणा राणौत. सुरुवातीला तिला पुष्कळ स्ट्रगल करावे लागले असले तरी तिने बॉलिवुडमध्ये आपली छाप पाडलीच. करण जोहरच्या विरोधात विधान करुनही ती बॉलिवुडमध्ये टिकून राहिली ते देखील तिचे वेगळेपण आहे. तिच्या विधानांमुळे ती जितकी प्रसिद्ध झाली, त्याचबरोबर तिची कारकीर्द देखील वाखाणण्याजोगी आहे. (Best Actress In India)
कंगणा राणौतने (Kangana Ranaut) गँगस्टरमधून पदार्पण केले. प्रबळ इच्छाशक्ती असलेली स्त्री पात्रे साकारून तिने स्वत:ला सिद्ध केले. फॅशन, राझ: द मिस्ट्री कंटिन्यूज, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तनू वेड्स मनू अशा अनेक चित्रपटांद्वारे तिने आघाडीच्या नायकांना टक्कर दिली आहे. आजही तिचा यशस्वी प्रवास सुरु आहे.
तर वाचकांनो. ह्या होत्या बॉलिवुडच्या अशा काही नायिका ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. (Best Actress In India)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.