मुंबईकरांनो, ‘बेस्ट’ आठवणी ‘बेस्ट’कडे शेअर करा!

127

‘बेस्ट’ बससेवा ही मुंबईकरांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. कोणतेही संकट येवोत, मग ते संकट नैसर्गिक असो अथवा मानवनिर्मित बेस्ट कधीही थांबलेली नाही, अगदी कोरोना काळातही बेस्ट बसगाड्या धावत होत्या. अशा ‘बेस्ट’ विषयी मुंबईकरांच्या असंख्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्या आठवणी व्यक्त करण्यासाठी बेस्टने मुंबईकरांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

बेस्ट दिन विशेषांक प्रसिध्द करणार 

७ ऑगस्ट रोजी बेस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट वार्ता’ या आपल्या मुखपत्राचा बेस्ट दिन विशेषांक प्रसिध्द करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुंबईकरांना आपल्या ‘बेस्ट’ बरोबरच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मुंबईकरांनी त्यांच्या आठवणी लिहून पाठवण्याची विनंती केली आहे. या मुखपत्रात सर्व माजी बेस्ट समिती अध्यक्ष, सर्व माजी महाव्यवस्थापक, सर्व आजी माजी महापालिका आयुक्त यांचे अनुभव आणि आठवणी असणार आहेत. याखेरीज प्रथितयश कलाकार, खेळाडू आणि प्रसिद्ध किंवा मोठ्या व्यक्तींचे अनुभवही मुंबईकरांना वाचायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या नागरिकांना ‘बेस्ट’बरोबरच्या आठवणी लिहिण्याची संधीदेखील बेस्टने उपलब्ध केली आहे.

(हेही वाचा राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द वगळा! हिंदु राष्ट्र संसदेत मागणी)

‘या’ लिंकवर पाठवा आठवणी

याशिवाय या उपक्रमांतर्गत प्रवासी संघटना तसेच उपक्रमाचे माजी कर्मचारी, अधिकारी यांनी ‘बेस्ट’बद्दलचे आपले अनुभव, आठवणी आदी साहित्य लिहून बेस्टला पाठवता येणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सुमारे तीनशे शब्दांमध्ये मुंबईकरांना बेस्टबाबतच्या आठवणी लिहिता येणार आहे. जनता संपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, मुंबई- 400 001 यांच्याकडे ईमेलद्वारे ([email protected]) 30 जून 2022 पर्यंत मुंबईकरांना आपले अनुभव किंवा आठवणी लिहून पाठता येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.