अलिकडेच बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यानंतर आता वातानुकूलित बसला आग लागल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगर येथून निघालेल्या वातानुकूलित बेस्ट बसला गुरूवारी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
( हेही वाचा : Rishi Sunak : घराच्या बाहेर स्वतः दिवे लावून हिंदू संस्कृतीचे घडवले दर्शन)
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
बसला बस चालकाच्या केबिनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. आग विझवण्यासाठी परिसरातील दुकानदारांनी प्रयत्न केले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
मुंबईत वातानुकूलित बेस्ट बसला भीषण आग@myBESTBus #fire #bestbus pic.twitter.com/OuXxx6ADYy
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 27, 2022
बेस्टची २८८ क्रमांकाची वातानुकूलित बस कांदिवली पूर्व येथून निघाली होती. लोखंडवाला परिसरातील अलिका नगर या स्टॉपवर ही बस आली आणि बसच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली.
Join Our WhatsApp Community