गोरेगावात बेस्ट बसचा अपघात; पाच जण जखमी

143

ज्योती हॉटेलकडून संतोष नगरकडे जाताना बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिपंळाच्या झाडाला बेस्टची बस धडकली. बेस्टची ही ३२६ क्रमांकाची बस असून या अपघातात बसचा चालक, वाहक, प्रवाशांसह रिक्षा चालक जखमी झाले आहेत. यासर्वांना उपचारासाठी वेदांत तसेच जागेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यासर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे कळवले आहे.

( हेही वाचा : महापालिकेने खरेदी केलेल्या ३५ लाखांपैंकी दीड लाख ध्वज सदोष; जनतेच्या हाती सदोष ध्वज न जाण्याची महापालिका घेतेय विशेष काळजी)

बेस्टची बस क्रमांक ३२६ ही बसगाडी दिंडोशी शिवशाही प्रकल्प वसाहती, दिंडोशी वरून कुर्ल्याकडे जात असताना दुपारी पावणे चारच्या सुमारास संतोष नगर बीएमसी कॉलनी ,डी वार्ड समोर शेजारी असलेल्या मंदिरावर जावून धडकली. या अपघातात बस चालक पुंडलिक धोंगडे, चालक आबासाहेब कोरे, बसमधील एक प्रवासी होवाळ पांडे आणि रिक्षा चालक असे ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाहक, चालक आणि प्रवासी यांना जोगेश्वेरी बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींना जवळच्या खासगी वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने ही बस पिंपळाच्या झाडाला धडक देत पुढील मोठा अपघात टाळण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.

जखमींची नावे:-

बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालय ,जोगेश्वरी

  • वाहक आबासो कोरे (वय ५४)
  • चालक कुंडलिक किसन धोंगडे (वय ४३)
  • प्रवासी- होवाळ सरकू पांडे (वय ४५)

वेदांत खाजगी रुग्णालय, दिंडोशी

  • गोविंद प्रसाद पाठक वय ८०
  • रजनिष कुमार पाठक वय ३७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.