बेस्ट बसच्या कंडक्टरला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. बसच्या मागच्या दरवाजातून उतरताना कंडक्टरने अडवले म्हणून संतापलेल्या प्रवाशाने कंडक्टरला गंभीर मारहाण केली होती. ही घटना जुलै २०१३ मध्ये घडली होती. या प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद तसेच उपलब्ध पुराव्यांची दखल घेत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.
( हेही वाचा : Jio Offer – जिओ युजर्ससाठी नवा प्लॅन; ९१ रुपयांत महिनाभर Unlimited डेटा आणि कॉलिंग)
प्रवाशाला सहा महिन्यांची शिक्षा
२३ जुलै २०१३ रोजी बस प्रवासात ड्युटीवर असलेल्या पंकज आगवणे यांनी प्रवाशांना बसच्या पुढील दरवाजातून उतरण्यास सांगितले यावेळी आरोपीने त्यांची सूचना न ऐकता मागच्या दरवाजातून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहक आगवणे यांनी त्याला मागच्या दरवाजाजवळ अडवले असता आरोपी प्रवाशाने त्यांना मारहाण केली. त्यात आगवणेंना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुरव्यांची दखल घेत सत्र न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी नुकताच निकाल दिला. सत्र न्यायाधीश तावशीकर यांनी आरोपीला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Join Our WhatsApp Community