मुंबईतील वडाळा, कुर्ला आणि वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट चालक संपावर गेले आहेत. कंटात्रदार कंपनीने वेतन वेळेवर न दिल्याने बेस्ट चालक संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे टाटा रुग्णालय, केईएम रूग्णालय या दिशेला जाणाऱ्या सध्या बंद असल्याची माहिती समोर येत आहेत. यामुळे रूग्णांसह सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.
…म्हणून पुकारला कंत्राटी बेस्ट चालकांनी संप
मुंबईतील वडाळा, कुर्ला, बांद्रा बेस्ट डेपोतील भाडेतत्वावरील बेस्ट बस चालकांनी गुरूवारी हा संप पुकारला आहे. यासंपामुळे दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालय मार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद करण्यात आल्यात. मात्र इतर चालकांच्या मदतीने सध्या ही बेस्ट बससेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेस्टचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने कंत्राटी बसचालकांना वेतन वेळेवर न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आणि ते संपावर गेलेत.
(हेही वाचा – आता मुंबईतली BEST लवकरच होणार १०० टक्के इलेक्ट्रिक!)
नाहीतर कंपनीविरुद्ध योग्य ती कारवाई होणार!
दरम्यान, भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर दिले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले होते. परंतु बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन बस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. सदर कंपनीविरुद्ध कंत्राटामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community