बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळणार?

महापालिका आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने उपक्रमाकडे केली आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाप्रमाणेच अनुदान मिळावे असे युनियनच्या पत्रात नमूद केले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांएवढेच अनुदान दिवाळीपूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांना द्यावे अशी मागणी आहे असे युनियच्या शशांक राव यांनी सांगितले.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ने जारी केली ऑगस्ट महिन्यात गहाळ झालेल्या स्मार्टफोनची यादी)

सानुग्रह अनुदानाची मागणी 

गेल्या वर्षी सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदान देण्यात आले होते. यंदाही दिवाळीपूर्वी हे अनुदान द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने उपक्रमाला पत्र देण्यात आले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षी सुद्दा वार्षिक २० हजार रुपये प्रमाणे दिवाळी बोनस दिला गेला होता. त्यामुळे आता या वर्षी पण २० हजार दिवाळी बोनस कामगारांना मिळणार की नाही ? हे पाहणे महत्वाचे आहे .

प्रिमियम बससेवा 

दरम्यान, वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKC मध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यामुळे येथून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची खूप गर्दी असते. म्हणूनच २६ सप्टेंबरपासून बेस्ट उपक्रमाअंतर्गत BKC ते ठाणे या मार्गावर प्रिमियम बससेवा सुरू करण्यात येणार आहे. बेस्टच्या प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर प्रिमियम बसमध्ये आरक्षित सीट मिळणार आहे. २ हजार लक्झरी बेससचा ताफा बेस्ट उपक्रमामध्ये सामील होणार असून पहिल्या टप्प्यात २०० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here