तरुणाने बेस्ट बसची काच फोडली…व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील हजारो रहिवासी दैनंदिन प्रवासासाठी बेस्ट बसचा वापर करतात. यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत बेस्ट बसला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर सध्या ट्राफिक असते त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. बसला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात अनेकवेळा वादाचे प्रसंग घडतात. गुरूवारी सकाळी मालाड परिसरात अशीच घटना घडली.

( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास)

संतापलेल्या तरुणाने बसची काच फोडली

बसमार्ग क्रमांक ३४५ ची एक बस मीठचौकी सिग्नलवर सकाळी ९.४५ वाजता उभी असताना एका प्रवाशाला गाडी पूर्ण भरलेली असल्याने बस मध्ये न घेतल्याने त्याने बससमोर येऊन बसगाडीची पुढील काच दगड़ाने फोडली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला बांगरनगर पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल केला आहे . बसमध्ये घेतले नाही याचा राग येऊन त्याने बस चालक आणि वाचकाला शिवीगाळ करून या तरुणाने दगडाने बसच्या काचा फोडल्या. सदर तरुण हा मालाड मीठ चौकी परिसरात राहणारा असून त्याला वर्सोवा या ठिकाणी जायचे होते. सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here