‘बेस्ट’चे स्टेअरिंग महिलांच्या हाती! महिला बसचालकाची नियुक्ती

132

मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या बेस्ट बसचे स्टेअरिंग आता लवकरच महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. बेस्टच्या माध्यमातून प्रवासांच्या सेवेसाठी आता महिला चालकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. (BEST bus gets first women driver) लक्ष्मी जाधव यांची पहिल्या बसचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जाधव यांच्यासह अन्य काही महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. लक्ष्मी यांची पहिली निवड करण्यात आली आहे. त्या मुलूंडच्या रहिवासी आहेत.

New Project 2 18

( हेही वाचा : ‘बेस्ट’ कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी; कंत्राटदारावर आर्थिक दंडाव्यतिरिक्त कारवाई व्हावी)

बेस्टमध्ये पहिल्यांदाच महिला बसचालक

बेस्टमध्ये कंत्राटदारांकडून चालविण्यात येणाऱ्या बस सेवेसाठी लक्ष्मी रुजू होणार आहेत. त्यांचे आवश्यक प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाले असून सध्या आणखी काही महिलांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवल्यावर लक्ष्मी जाधव या त्यांचे काम सुरू करतील. धारावी बस आगार ते दक्षिण मुंबई या मार्गावर त्या बेस्ट चालवतील. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बसचालक बस चालवणार आहे. येत्या काही दिवसांत आम्ही आणखी काही महिला चालकांची निवड करू असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.