बेस्ट बसच्या कंडक्टरला मारहाण करणाऱ्याला सहा महिन्यांचा तुरुंगवास

164

बेस्ट बसच्या मागच्या दरवाजातून उतरताना अडवले म्हणून संतापलेल्या आरोपीने कंडक्टरला गंभीर स्वरुपाची मारहाण केली होती. या प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद तसेच उपलब्ध साक्षीपुराव्यांची दखल गेत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. बेस्ट कंडक्टरला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

( हेही वाचा : न्यूमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण मुंबईत २०२५ पर्यंत होणार कमी)

बस प्रवासात ड्युटीवर असलेले पंकज आगवणे या कंडक्टरेने सर्व प्रवाशांना पुढील दरवाजातून उतरण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने त्यांची सूचना न ऐकता मागच्या दरवाजातून उतरण्याचा प्रयत्न केला. दरवाजाजवळ अडवले असता आरोपी प्रवाशाने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली. यात कंडक्टर आगवणे यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे असे मत व्यक्त करत सत्र न्यायाधीश एस.डी.तावशीकर यांनी आरोपीला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.