बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

115

भाजपा बेस्ट कामगार संघाची सर्वसाधारण सभा व स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी विदर्भ वैभव मंदिर सभागृह, दादर मुंबई येथे सर्व कामगारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके, सरचिटणीस गजानन नागे तसेच सर्व आगारातील भाजपा बेस्ट कामगार संघ युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. अनेक विषयावर चर्चा करून सर्व बेस्ट कामगारांचे प्रश्न कसे सोडवता येतील याविषयी चर्चा करण्यात आली. बेस्ट कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजप बेस्ट कामगार संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

( हेही वाचा : Mahrashtra Tourism : मुंबई-पुण्यातील मानाच्या बाप्पांचे दर्शन! आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; असे करा बुकिंग)

चर्चेदरम्यान महत्त्वाचे विषय :

  • बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण
  • कंत्राटी पद्धतीने जो कारभार सुरू आहे तो थांबवण्यात यावा
  • ग्राउंड बुकिंग बंद करण्यात यावे
  • आगार अधिकाऱ्यांची सुरू असलेली मनमानी थांबवण्यासाठी अधिकारांवर कारवाई करण्याबाबत महाव्यवस्थापकांना पत्र देण्यात यावे
  • २०१६ पासून थकित असलेला करार व २०२२ पासून दुसरा सुरू होणारा नवीन करार हे दोन्ही करार लवकरात लवकर पूर्ण करावेत.
  • बेस्ट बसेस व उपक्रमात कंत्राटी पद्धतीने सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवण्याची मागणी
  • तसेच 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत सर्व मुंबईतील बेस्ट आगारांमध्ये घर घर तिरंगा अभियान सुरू करण्याचा निर्धार सर्व आगार अध्यक्ष व सचिव यांनी केला. यानंतर सर्व बेस्ट कामगारांना राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.

यावेळी संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आनंदा जरग, राजकुमार घार्गे,अनिल यादव,विजय माळवे, सूर्यकांत हेगीष्टे,संतोष काटकर,राजू लिहिणार, श्रीकांत गालांडे,सोमनाथ भंडारी,खंडू घुगे,परेश चिले,विशाल भोसले,महेश राऊत,राजू शेख,उत्तम पवार,संदिप सांगळे,सुरेश गुप्ता,विठ्ठल बेहेरे,चेतन चौहान,झुंबर जाधव,महेश राऊत उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.