नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! २६ अतिरिक्त बसगाड्या धावणार

यंदा २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत महालक्ष्मी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसात मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरात येतात, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या बसमार्गावर दररोज २६ अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : बेस्टचा स्वस्त मस्त प्रवास! मासिक, त्रैमासिक बसपासमध्ये ५० टक्के बचत)

२६ अतिरिक्त बसगाड्यांचे नियोजन

२८, ३७, ८३, ५७, ए-७७, १५१, ए १२४, ए ३५०

विशेष बसफेऱ्यांचे नियोजन 

या व्यतिरिक्त उपनगरीय प्रवाशांसाठी भायखळा आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकाहून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरिता गर्दीच्या वेळी विशेष बससेवा या दोन स्थानकांच्या दरम्यान नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात चालविण्यात येतील. तसेच जिजामाता उद्यान ( भायखळा पूर्व) ते महालक्ष्मी मंदिर मार्गे भायखळा स्थानक ( पूर्व ) आणि महालक्ष्मी स्थानक अशा विशेष बसफेऱ्या देखील नियोजन करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here