जानेवारीपासून बेस्ट मार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या…

१ जानेवारीपासून बेस्टने काही नवीन बसमार्ग सुरु केले असून यामध्ये बोरिवली ते कांदिवली ही २८४ क्रमांकाची आणि घाटकोपर पश्चिम येथील ए ३८९ हे दोन नवीन बस मार्ग सुरु करण्यात येत आहेत. याशिवाय ७ बस मार्गांचे विस्तारीकरण, तसेच सहा बस मार्गावरील बसचे क्रमांक बदलण्यात आले असल्याची माहिती बस उपक्रमाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

हे दोन नवीन बसमार्ग होणार सुरु 

 • २८४ हा नवीन बसमार्ग सुरु करण्यात आला असून या मार्गावरील बस बोरिवली स्थानक (पश्चिम) ते कांदिवली स्थानक (पश्चिम) दरम्यान साईबाबा नगर मार्गे धावणार आहे, या बसमार्गावरील बस ७.३५ ते २२.३० दरम्यान धावतील.
 • ए ३८९ हा नवीन बसमार्ग घाटकोपर स्थानकावरून (पश्चिम ) भटवाडी , बर्वे नगर व मुक्ताबाई रुग्णालय मार्गे वर्तुळाकार सुरु करण्यात आला आहे . या बसमार्गावरील बस सकाळी ६.१५ ते २१.५० दरम्यान उपलबध असतील .

या बसमार्गांचा होणार विस्तार

 • बस क्रमांक ए १ :  आर सी चर्च ते माहीम दरम्यान धावणारी ए १ ही बस आता वांद्रे रेक्लेमेशन बस स्थानक पर्यंत जाईल.
 • बस क्रमांक ए ३० :  इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान धावणारी ए ३० ही बस आता चुनाभट्टीपर्यंत धावेल.
 • बस क्रमांक ४५ : एमएमआरडीए वसाहत माहुल ते मंत्रालय दरम्यान धावणाऱ्या ४५ क्रमांकांच्या बसमार्गाचा विस्तार बॅकबे आगारापर्यंत करण्यात आला आहे.
 • बस क्रमांक १२६ : जिजामाता उद्यान ते ऑगस्ट क्रांती मैदान दरम्यान धावणाऱ्या बस क्रमांक १२६ चा विस्तार गिरगाव मेट्रो  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गे स्वामी दयानंद सरस्वती चौक फोर्ट मार्केट पर्यंत करण्यात आला आहे .
 • बस क्रमांक २०० : यारी मार्ग बस स्थानक ते माहीम दरम्यान धावणाऱ्या २०० क्रमांक बसचा विस्तार शिवाजी पार्क खोदादाद सर्कल मार्गे वडाळा आगारापर्यंत करण्यात आला आहे.
 • बस क्रमांक ३८८ : कन्नमवार नगर २ ते कुर्ला आगार दरम्यान धावणाऱ्या ३८८ मर्यादित या बसचा विस्तार सांताक्रूझ बस स्थानक (पूर्व ) पर्यंत करण्यात आला आहे.
 • बस क्रमांक ए  ४१ : भाऊचा धक्का (रो पॅक्स टर्मिनल ) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान धावणाऱ्या ए ४१ या बसचा विस्तार कुलाबा बस स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.

( हेही वाचा : ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक, तरी धोका नाही! )

बस मार्गातील बदल आणि बदलेला क्रमांक

 • बस क्रमांक सी २ : इलेक्ट्रिक हाऊस ते धारावी आगार दरम्यान धावणाऱ्या सी २ हि बस आता सी ११ या नवीन क्रमांकाने  धावेल.
 • बस क्रमांक ए ११६ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन सी पी ए दरम्यान धावणारी ए ११६ हि बस आता गेट वे ऑफ इंडिया येथून सुटेल.
 • बस क्रमांक  १३९ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गीता नगर दरम्यान धावणारी १३९ आता वातानुकूलित ए १३९ म्हणून धावेल.
 • बस क्रमांक ए ३७२ : ट्रॉमबे ते घाटकोपर आगार दरम्यान धावणाऱ्या ए ३७२ चा मानखुर्द स्थानक (दक्षिण) येथील दोन्ही बाजूचा वळसा रद्द करण्यात आला आहे.
 • बस क्रमांक ए ६६ : बॅलार्ड पियर ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान धावणारी वातानुकूलित ए ६६ हि बस आता ६६ साधी  धावेल.
 • बस क्रमांक सी ४२ : राणी लक्ष्मीबाई चौक सायन ते बाळकूम दादलानी  पार्क (ठाणे )दरम्यान धावणारी सी ४२ हि साधी बस वातानुकूलित ए सी ४२  मध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here