वांद्र्यातील ‘बेस्ट’ बस मार्ग पूर्ववत! रेल्वेस्थानकापर्यंत सेवा सुरू

वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात नाल्याच्या भिंतीचे आणि रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे गेले कित्येक दिवस रेल्वे स्थानकापर्यंत बेस्ट सेवा दिली जात नव्हती यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते वांद्रे स्थानक, शासकीय वसाहत येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल व्हायचे. जवळपास ६ ते ७ महिने बंद असलेली ही बससेवा आता सुरू झालेली आहे. यामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.

( हेही वाचा : Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी खुशखबर! SBI बॅंकेच्या सहकार्याने सरकार देणार नवी सुविधा)

वांद्र्यातील ‘बेस्ट’ बस मार्ग पूर्ववत

रेल्वे स्थानकापर्यंत बससेवा नसल्यामुळे गेले कित्येक दिवस वांद्रे पूर्व परिसरात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू होता. हवे तसे पैसे आकारले जायचे यासंदर्भात अनेक स्थानिकांच्या तसेच बीकेसीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या याची नोंद घेत आता बससेवा मार्ग पूर्ववत झालेला आहे. वांद्रे रेल्वे टर्मिनस येथून 316, 317 या मार्गावरील बेस्ट बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सेवा पुन्हा सुरू केल्याने वांद्रे स्टेशन ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील बाहेरील नाल्याच्या भिंतीचे काम सुरू असल्यामुळे मार्ग क्रमांक 310, 316 आणि 317 वरील बस सेवा मार्गांमध्ये बदल केले होते. या कामामुळे अरुंद रस्त्यावर बसेस चालवणे अवघड झाले होते. आता काम पूर्ण झाले असून रस्ता रुंद झाल्याने बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here