मुंबई पोलिसांसाठी आयुक्तांनी घेतला ‘BEST’ निर्णय!

219

मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट बस गेली अनेक वर्ष मुंबई पोलिसांना निःशुल्क सेवा देत होती. मात्र १ जून पासून बृहन्मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांचा बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयामधून मोफत प्रवास बंद करण्यात आला आहे. मोफत प्रवास बंद झाला असला तरीही मुंबई पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पोलिसांच्या प्रवासावर होणारा खर्च बेस्टला देणे बंद करून थेट पोलिसांच्या दरमहा वेतनात हा वाहतूक भत्ता जमा केला जाणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस विभागात आनंदाचे वातावरण आहे.

( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात २ लाख ७५ हजार जागांसाठी मेगाभरती)

वाहतूक भत्ता देणार 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दरमहा कॉन्सटेबल ते एएसआयचा २७०० ते ३२०० रुपये तर पीएसआय ते एसीपी यांचा ४८०० ते ५२०० रुपये पगार बेस्टच्या खात्यात जायचा. या बदल्यात पोलिसांना बेस्टच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र अलिकडे बहुतांश पोलीस हे रेल्वे आणि स्वत:च्या खासगी वाहनातून प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत बेस्टला देण्यात येणारा भत्ता बंद करून पोलिसांना यापुढे त्यांच्या दरमहा वेतनात हा वाहतूक भत्ता देण्यात यावा हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय २२ एप्रिल रोजी घेण्यात आला मात्र याची अंमलबजावणी १ जून पासून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.