तिकीट देता देता..कंडक्टरचा असाही मार्केटिंगचा फंडा…

तिकीट देता देता आता बेस्टचे कंडक्टर, ‘भाई २०० रुपये का कार्ड लेलो’, असे म्हणत बेस्टच्या सुपर सेव्हर कार्डची मार्केटिंग करत आहेत. सध्या अशाच एका वाहकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात नागरिकांचा बेस्ट प्रवास सोयीचा व्हावा,  यासाठी ‘चलो अ‍ॅपचे’ अनावरण केले. या अ‍ॅपमुळे मुंबईकरांना घरबसल्या बसचे लोकेशन, तिकिटांमध्ये सवलत, सुपर सेव्हर पास या सुविधांचा लाभ मिळत आहे. हे अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. यामुळे मुंबईकरांना अनेक सुविधा प्राप्त होणार असून घरबसल्या आपली बस कुठे आहे हे सुद्धा ट्रॅक करता येणार आहे.

सुपर सेव्हर पासच्या जास्तीत जास्त विक्रिसाठी बेस्टने चलो अॅप अंतर्गत, बस वाहकांकरिता डिजिटल प्रमोशन योजनेला सुरुवात केली आहे. 

  1. बस वाहकांनी बेस्ट चलो बस पासची विक्री केल्यास प्रत्येक कार्ड मागे वाहकाला ५ रुपये बोनस मिळेल.
  2. एकाच दिवशी १० बस पासची विक्री केल्यास २० रुपये अतिरिक्त बोनस मिळेल.
  3. प्रत्येक महिन्याला पात्र बस वाहकांना प्रत्येकी ५०० रुपये अतिरिक्त बोनस दिला जाईल. (कमीत कमी ५० कार्ड विक्री)
  4. त्रैमासिक बक्षिस म्हणून आगारातील १० पात्र बस वाहकांना प्रत्येकी १ हजार रुपये दिले जातील.

( हेही वाचा : बेस्ट गाड्यांमध्ये लस प्रमाणपत्र तपासतच नाही! कारण… )

सुपर सेव्हर बस पास 

या योजनेला प्रतिसाद म्हणून बेस्टचे वाहक सुपर सेव्हर पासची विक्री करत असताना दिसत आहे. या सेव्हर पासमुळे तुम्हाला तुमच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यास मदत होते. सुपर सेव्हर योजना चलो कार्ड आणि चलो अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. तुमच्या सोबत तुम्ही हे स्मार्ट कार्ड कायम बाळगू शकता. यात वेळोवेळी पैसे भरून रिचार्ज करणे गरजेचे आहे.

( हेही वाचा : पुस्तकरुपात रतन टाटा यांचा जीवनपट येणार जगासमोर! )

वाहकाचा व्हिडिओ व्हायरल

बेस्टच्या बक्षिसरुपी योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या सर्व वाहक मोठ्या दिमाखात या पासची विक्री करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये कंडक्टर ‘मेरे प्यारे देशवासीयो ये बेस्ट कंपनीका नया कार्ड है सिर्फ ७० रुपये का है’ असे म्हणत, त्या कार्डचे फायदे सांगत असताना, प्रवाशांना हे सुपर सेव्हर कार्ड विकत घेण्यासाठी प्रेरित करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here