बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समस्या अनेक…

205

बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात वेट लिजेसच्या म्हणजेच भाडेतत्वावरील बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस टाटा मार्कोपोलो कंपनीच्या आहेत. या बसेसमध्ये कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेच. सध्या बेस्टमध्ये ३ महिला ड्रायव्हर असून २२ हून अधिक महिला कंडक्टरची भरती करण्यात आली आहे. कंत्राटी बसेसच्या डिझाईनमुळे प्रवाशांना सुद्धा गर्दीच्यावेळी बसमधून चढताना-उतरताना त्रास होतो.

( हेही वाचा : Shraddha Murder Case : आरोपी आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ)

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या 

टाटा मार्कोपोलो कंपनीच्या साध्या बसेस सध्या प्रतिक्षानगर आगारातून सोडल्या जात आहेत. प्रतिक्षानगर आगाराचे संपूर्ण खाजगीकरण झाले आहे असा आरोप बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचारी संघटनांकडून गेली अनेक वर्ष करण्यात येत आहे. प्रतिक्षानगर आगारात सध्या कंत्राटी तत्वावरील महिला कंडक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला कंडक्टरना त्यांच्या कंत्राटदारांकडून २० हजार रुपये प्रगाराचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्षात १३ ते १४ हजार रुपये वेतन दिले जाते. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंडक्टरच्या बेलच्या दोऱ्या इतक्या वर आहेत की, काही महिला कर्मचाऱ्यांना बेल वाजविणे शक्य होत नाही.

हे कंत्राटी चालक आणि वाहक मुंबई बाहेरचे असल्याने त्यांना मुंबईतील फारशी माहिती नाही त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा बस थांब्यांबाबत माहिती नसल्याने गाड्या थांबवल्याही जात नाहीत. बेस्टच्या कंत्राटी वाहकांची महिला कंडक्डरची भरती करताना त्यांची उंची आणि शारीरिक क्षमतेचा विचार केलेला नाही त्यामुळे अशा समस्या उद्भवत असल्याची प्रतिक्रिया सुनील गणाचार्य यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.