मुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा असणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी मिनी बसेस चालकांनी पुन्हा एकदा मंगळवारी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. कंत्राटदार कंपनी वेळेत पगार देत नाही. तसेच थकित देणी देत नाही, अशा तक्रारी करत बेस्टच्या कंत्राटी मिनी बसेस कामगारांनी मंगळवारी सकाळपासूनच कामबंद आंदोलन केले आहे. कंत्राटदार कंपनी वेळेत पगार देत नसल्याने चालक आक्रमक होत त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. परिणामी मुंबईतील तीन आगारांतून दिवसभरात १६३ बेस्ट बसेस धावल्याच नाही त्या न चालवता आगारातच उभ्या होत्या.
संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करा
बेस्टच्या कंत्राटी मिनी बसेस चालकांनी आंदोलन केल्याने कुर्ला, विक्रोळी आणि वांद्रे तिन्ही आगाराशी संबंधित असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मिळालेल्या माहितीनुसार, थकित देण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्याची बेस्ट चालकांची तिसरी ते चौथी वेळ होती. यावेळी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करा, अशी मागणीही आक्रमक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे केली. सध्या बेस्टमध्ये सहा कंत्राटदाराकडून विविध आगार आणी मार्गावर बसेस चालविल्या जातात. त्यापैकी एका कंत्राटदाराकडून त्यांनी नियुक्त केलेल्या चालक-कामगारांचे पगार बाकी अल्याने कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
(अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार सुरू, यात्रेला जायचंय? असं करा रजिस्ट्रेशन)
कंत्राटदाराला आकारला दंड
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने आपल्या बसेस प्रवाशांसाठी सेवेत काढल्या. नेहमीचे जे बेस्ट कर्मचारी होते त्यांना जादा बसेस सोडून कामावर पाठवले. मात्र असे असले तरी वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यावर बेस्ट प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जावीत, अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्टने त्यांच्या ९४ बसेस चालविल्या. संपामुळे कंत्राटदाराला बेस्टकडून प्रत्येक बस मागे ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
…म्हणून उतरले कर्मचारी रस्त्यावर
दरम्यान, बेस्च उपक्रमाने सेवा कंत्राटी स्तरावर चालवण्याचा निर्णय गेल्या काही वर्षांत घेतला आहे. निवदेनामार्फत निवडण्यात आलेल्या कंत्राटदारांना बेस्ट उपक्रमामार्फत ठरल्यानुसार रक्कम दिली जाते. मात्र कंत्राटदारांकडून त्यांची देणी आणि पगार काही वेळा वेळेवर दिला जात नाही, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांकडून येत आहेत. त्यामुळे हे कंत्राटी कामगार त्रस्त होऊन त्यांनी आंदोलनाचं हत्यारं उपसलं आहे.
Join Our WhatsApp Community