बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; या आहेत प्रमुख मागण्या

136

बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलन केले आहे. आता पुन्हा एकदा कंत्राटी चालकांच्या मागण्यांसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कंत्राटी कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झाले आहे. युनियनने सोमवारी ओशिवरा, मंगळवारी वडाळा आगारात आंदोलन केल्यानंतर बुधवारी शिवाजी नगर बस आगारात आंदोलन केले जाणार आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ ई-कॅब लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत; ओला-उबेरपेक्षा स्वस्तात होईल प्रवास!)

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

या आंदोनलनात शेकडो कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. यावेळी युनियनचे नेते शशांक राव यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक, महापालिका आयुक्त आणि बेस्टच्या कंत्राटदारांना कामगारांच्यावतीने निवेदन सादर केले. बेस्ट उपक्रमात कंत्राटी चालकांना सामावून घेताना त्यांच्याकडून समान कामे करून घेतली जातात. परंतु त्यांना समान वेतन आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसल्याची तक्रार कंत्राटी कामगारांची आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली दिवाळी बोनसची मागणी 

बेस्टमधील कंत्राटी कामगारांना सुद्धा समान काम-समान वेतन लागू करण्याची मागणी केली जात आहे. तसेच वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कामयस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस दिला जावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.