मुंबईतील वडाळा, कुर्ला आणि वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट चालक गुरुवारी संपावर गेले होते. कंत्राटदार कंपनीने वेतन वेळेत न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही हा संप सुरू ठेवला आहे. एमपी नावाच्या या कंत्राटदाराकडे मुंबईतील पाच डेपोला बसचालकासह बस पुरवण्याचे कंत्राट आहे. बांद्रा, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या डेपोतील सुमारे ५०० चालकांनी शुक्रवारीही बेस्ट बस बाहेर काढल्या नाहीत यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्टच्या शेकडो एकर जागेवर सत्ताधाऱ्यांचा डोळा’! भाजपचा आरोप )
जनसंपर्क अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
एम पी ग्रूपच्या कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे बांद्रा, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा आगारांमधून आज एकही बस गाडी आतापर्यंत प्रवर्तित झालेली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या प्रवर्तित केलेल्या आहेत. सदर कंत्राटदाराविरुद्ध कंत्राटातील अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई केली जाईल. दंड वसुली, कंत्राट रद्दबातल करणे यापैकी जे कंत्राटामध्ये परिस्थिती अनुरूप मान्यताप्राप्त असेल तशी कारवाई प्रशासन करेल. असे आश्वासन देऊन सुद्धा हा संप सुरूच आहे.
भाजपचा आरोप
या संपामुळे टाटा, केईएम रुग्णालयात जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बेस्टमध्ये कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरच्या बस व कंत्राटी कामगार आणून, बेस्ट कामगार त्यांचे कुटुंब व बेस्टला संपवण्याचे भयंकर षडयंत्र सत्ताधारी पक्षाने आखलेले आहे असा आरोप भाजपच्या कामगार आघाडीने केला आहे.
Join Our WhatsApp Community