विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेससमोर आपल्या मुलासह वडिलांनी उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून सहा वर्षीय मुलगा मात्र या अपघातातून सुखरुप बचावला आहे. रेल्वे पोलिसांनी मुलाला आईच्या ताब्यात दिले असून, वडिलांचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी कायम! आणखी पाच मेगाब्लाॅक, वाचा सविस्तर )
मुलगा सुखरुप बचावला
उल्हासनगर येथे राहणारे प्रमोद आंधळे हे आपल्या मुलासह विठ्ठलवाडी परिसरात पोहचले होते. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या धावत्या मेलसमोर प्रमोद व त्यांच्या सहा वर्षीय मुलाने उडी मारली. प्रमोद यांचा उडी मारल्यावर जागीच मृत्यू झाला तर, त्यांचा सहा वर्षीय मुलगा स्वराज मात्र ट्रॅकमधून बाहेत पडल्याने या अपघातातून बचावला आहे. प्रमोद आंधळे हे उल्हासनगर शांती नगर येथे पत्नी, मुलगा व मुलीसमवेत राहत होते.
प्रमोद आंधळे हे बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. त्यामुळे नोकरीवर असताना त्यांनी आपल्या मुलासह आत्महत्येचे पाऊल का उचलले हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी आत्महत्या का केली, त्याचे कारण याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद
Join Our WhatsApp Communityबेस्ट चालकाची आत्महत्या! धावत्या मेलसमोर मुलासह मारली उडी… @myBESTBus pic.twitter.com/qgl9Gw88Lu
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 17, 2022