बेस्ट उपक्रमात निरीक्षक हे जबाबदारीचे पद असून, विक्रोळी आगारातील बस निरीक्षक नंबर १३ यांनी काही चालकांचे ५ मे २०२२ रोजीचे सिग्नल जंपिंगचे रिपोर्ट चौकशी होण्याआधीच सोशल मिडियावर टाकून प्रसिद्ध केले. चौकशी आधीच सिग्नल जंपिंगचे रिपोर्ट प्रसिद्ध झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या नियमांचे व चालकांची बदनामी करण्याचे कारस्थान केले असा आरोप बेस्ट बस निरीक्षकांवर समर्थ बेस्ट कामगार संघटनेने केला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’मध्ये कंत्राटीकरण नको…औद्योगिक न्यायालयाचे आदेश )
बेस्ट बस निरीक्षकांच्या या कृतीचा विक्रोळी आगारातील सर्व कामगारांनी समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या वतीने फलक लावत जाहीर निषेध केला आहे. तसेच बेस्ट प्रशासनाने सदर बाबीची योग्य ती चौकशी करून दखल घ्यावी असेही कामगार संघटनेने सांगितले आहे.
विक्रोळी आगारात फलक
काही दिवसांपूर्वी दिंडोशी आगारात सुद्धा इतर आगारातून बदली होऊन आलेले नवीन अधिकारी, तेथील कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत. असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. दिंडोशी आगारात दिवसेंदिवस कर्मचारी तसेच बसेसची संख्या कमी होत आहे. याउलट प्रवासी संख्या मात्र वाढत असून यामुळेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला होता. त्यामुळेच कामगारांचा जीव जाईपर्यंत मनमानी पद्धतीने काम करून घेतले जाणार आहे का असा सवाल दिंडोशी आगारातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता.
Join Our WhatsApp Community