बेस्ट कर्मचारी संतप्त; मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

दहिसरमध्ये सोमवारी १४ नोव्हेंबरला रात्री बसवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बेस्ट बसच्या काचा फोडल्या सुद्धा फोडण्यात आल्या, बेस्ट बसची एका कारला टक्कर लागल्याने कार चालकाने आपल्या साथीदारांना बोलावून ही दगडफेक केली होती. दरम्यान याच घटनेचा आणखी एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

बसवर दगडफेक होत असताना परिसरातील नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला. या व्हायरल व्हिडिओद्वारे बेस्टच्या चालक-वाहकांना या कार चालकाने व साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता कर्मचारी वर्गात रोष पसरला आहे.

दहिसर घटनेत कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत चुकीची आहे याबाबत बेस्ट कामगारांच्या युनियनने आवाज उठवणे आवश्यक आहे. या बस चालक-वाहकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र आले पाहिजे आणि कार चालक तसेच साथीदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here