बेस्ट अॅलॉटीज असोसिएशनची, परळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अयोग्य वेळी घोषित करण्यात आल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी बेस्ट कामगारांनी केली आहे.
( हेही वाचा : बेस्टचे कंत्राटी कामगार आक्रमक; १९ मे पासून जाणार बेमुदत संपावर! )
निवडणूक का पुढे ढकलावी?
- प्रत्यक्षात १५ मे २०२२ रोजी निवडणूक अधिसूचना घोषित होऊन सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली नव्हती परंतु ही घोषित अधिसूचना १६ मे २०२२ रोजी रात्री उशिरा प्रसिद्ध फलकावर लावण्यात आली.
- मतदार यादी घोषित केल्यानंतर त्यावर हरकत घेण्याकरता पुरेसा कालावधी देण्यात आलेला नाही.
- निवडणुकीच्या तयारी करता उमेदवारांना अत्यंत कमी म्हणजेच २० दिवसांचा अपुरा कालावधी देण्यात आलेला आहे.
- कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर दोन वर्षांनी मिळालेल्या सुट्टीच्या दिवसामध्ये बेस्टच्या परळ वसाहतीमधील अनेक कामगार आपल्या गावी गेले असल्यामुळे त्यांना उमेदवारी पदाचा अर्ज भरण्यापासून वंचित रहावे लागले आहे.
- निवडणूक अयोग्यवेळी घोषित करण्यात आली.
सर्वसामान्य सभासदांच्या हिताचा निर्णय घेत पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी बेस्ट कामगारांकडून मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community