बेस्ट अ‍ॅलॉटीज असोसिएशनची निवडणूक पुढे ढकला कामगारांची मागणी

बेस्ट अ‍ॅलॉटीज असोसिएशनची, परळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अयोग्य वेळी घोषित करण्यात आल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी बेस्ट कामगारांनी केली आहे.

( हेही वाचा : बेस्टचे कंत्राटी कामगार आक्रमक; १९ मे पासून जाणार बेमुदत संपावर! )

निवडणूक का पुढे ढकलावी?

  • प्रत्यक्षात १५ मे २०२२ रोजी निवडणूक अधिसूचना घोषित होऊन सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली नव्हती परंतु ही घोषित अधिसूचना १६ मे २०२२ रोजी रात्री उशिरा प्रसिद्ध फलकावर लावण्यात आली.
  • मतदार यादी घोषित केल्यानंतर त्यावर हरकत घेण्याकरता पुरेसा कालावधी देण्यात आलेला नाही.
  • निवडणुकीच्या तयारी करता उमेदवारांना अत्यंत कमी म्हणजेच २० दिवसांचा अपुरा कालावधी देण्यात आलेला आहे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर दोन वर्षांनी मिळालेल्या सुट्टीच्या दिवसामध्ये बेस्टच्या परळ वसाहतीमधील अनेक कामगार आपल्या गावी गेले असल्यामुळे त्यांना उमेदवारी पदाचा अर्ज भरण्यापासून वंचित रहावे लागले आहे.
  • निवडणूक अयोग्यवेळी घोषित करण्यात आली.

सर्वसामान्य सभासदांच्या हिताचा निर्णय घेत पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी बेस्ट कामगारांकडून मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here