बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचालीवर होणार निर्णय

140

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील नैमित्तिक कामगारांची गुरूवारी २४ मार्च रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत बेस्ट समितीचे सदस्य सुनील गुलाबराव गणाचार्य उपस्थित राहणार असून यावेळी कामगारांच्या समस्यांवर चर्चा करून पुढील वाटचालीच्या दृष्टीने सूचना, मार्गदर्शन केले जाणार आहे. भाजपा प्रदेश कार्यालय ‘वसंत स्मृती’ दादर-पूर्व येथे दुपारी ४.०० वाजता ही बैठक होणार आहे.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्यांची घेतली दखल! )

कामगारांच्या समस्यांवर चर्चा करून मार्गदर्शन 

मालाड आणि मालवणी आगारात बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी मंगळवारी दूपारी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी तेथील समस्या जाणून घेत कामगारांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या.

New Project 3 8

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.