भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस गजानन नागे आणि पदाधिकारी यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकश चंद्रा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार बेस्ट कामगारांना गणपतीपूर्वी रजा प्रवास भत्ता देण्याबाबत व कोविड भत्ता देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
( हेही वाचा : सोलापूर परिचारिका महाविद्यालयातील प्रकरणाबाबत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलनाचा इशारा)
कोविड भत्ता आणि इतर थकीत देण्यांबाबत चर्चा करणार
बेस्ट कामगारांचे एलटीए आणि रजेचे पैसे कामगारांच्या बॅंक खात्यामध्ये सोमवार २९ ऑगस्टपर्यंत जमा होतील असे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले. कोविड भत्ताबाबत महापालिकेच्या आयुक्तांसमवेत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस नागे हे पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून बेस्ट कामगारांचा कोविड भत्ता आणि इतर थकीत देण्यांबाबत चर्चा करणार आहेत. यामुळे कामगार संघातर्फे भाजप बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके, सरचिटणीस गजानन नागे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
दरम्यान, बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आणि दहावीनंतर बारावीपर्यंत मुलांना सवलतीचा बसपास दिला जातो. या सवलतीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी नाहीत त्यांनाही हा पास देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची थकित देणीही गणेशोत्सवाआधी ताबडतोब देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community