‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांची ‘या’ मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम!

स्वाक्षरी मोहिमेसह, प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली आहे

139

बेस्टचे अनेक आगार तातडीने बंद करून या भागात हे आगार मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’या कंत्राटदाराला आंदण म्हणून बहाल केले व यास बेस्ट कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. बेस्टच्या मालकीच्या जागा खासगी कंत्राटदारांनी देऊ नये, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, बेस्ट प्रशासनाने ३ हजार ३३७ स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा कायम राखणे, या अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम १४ मार्चपासून सुरू होणार असून या स्वाक्षरी मोहिमेसह, प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांनो आता ध्वनी प्रदूषणापासून होणार सुटका! वाचा आयुक्तांचा ‘हा’ मोठा निर्णय )

कृती समितीचा विरोध

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या २०१९ च्या संपादरम्यान समंजस्य करार करण्यात आला होता. बेस्टचा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच ३ हजार ३३७ बेस्ट बसगाड्या कायमस्वरुपी राखल्या जातील असे आश्वासन बेस्ट उपक्रमाने दिले होते. परंतु आता बेस्टमध्ये ३ हजार ५१९ बस असून त्यातील १ हजार ६२३ बस भाडेतत्वावरील आहेत. असे कृती समितीचे पदाधिकारी शशांक राव यांनी सांगितले. तसेच प्रतीक्षानगरसह इतर आगार कमी किमतीत भाडेतत्त्वावर दिले असून या निर्णयालाही कृती समिती व राव यांनी विरोध केला आहे. या प्रमुख मागण्यांसाठी बेस्टकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असून याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमातील नोकऱ्यांवर परिणाम

दरम्यान, या खासगीकरणामुळे २४ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती भाजपचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. येत्या काळात बेस्ट ३ हजार बसेस भाडेतत्वावर घेणार आहे यात चालक वाहकांची नियुक्ती सुद्धा कंत्राटदारामार्फत केली जाणार आहे. या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. शिवसेनेने कॉंग्रेसच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला असून यामुळे बेस्ट उपक्रमातील नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, अशी भीती प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.