बेस्टच्या ताफ्यात येणार नव्या बस; पण कर्मचारी वर्गात नाराजी काय आहे कारण?

बेस्टच्या ताफ्यात आता लवकरच नव्या बसेस दाखल होऊन प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. यामुळे मुंबईत बसेसची वारंवारता वाढेल आणि प्रवाशांना वेळेत सुविधा मिळण्यास मदत होईल. परंतु या नव्या बसेस ताफ्यात येण्यापूर्वी कर्मचारी वर्गाकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा : T20 विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर BCCI संतापले; राहुल, रोहितसह विराटसोबत घेणार बैठक)

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नाराजीची कारणे

  • ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या बसेस या कंत्राटदाराकडून चालवल्या जाणार आहेत. परंतु बेस्ट प्रशासनाने स्वत:च्या मालकीच्या बसेस आणि त्यावर कायमस्वरूपी कामगार भरती करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
  • बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी ऐन दिवाळीतच संप पुकारला होता त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, आणि परिणामी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त डुट्या कराव्या लागल्या त्यामुळे कर्मचारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
  • कामगारांना द्यायला पैसे नाहीत मग कंत्राटदारावर बेस्टकडून एवढी मेहेरबानी का केली जाते असा संतप्त सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे.

खाजगीकरण बंद करावे…

या आंदोलनामुळे बेस्ट उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. बेस्ट प्रशासनाने स्वतःचे सर्व कर्मचारी, बसेस ठेवल्या असत्या तर ही वेळच आली नसती अशाप्रकारची चर्चा सध्या नियमित सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. बेस्ट प्रशासनाने यातून मार्ग काढत खाजगीकरण बंद करून स्वतःच्या मालकीच्या बसेस आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची नियमाने भर्ती करावी, बेस्ट उपक्रमाला आणि मुंबईकरांना नेहमी होणारा मनस्ताप कायमचा संपवून टाकावा अशी मागणी सध्या कर्मचारी व मुंबईकर प्रवाशांकडून केली जात आहे.

३ कंत्राटदारांच्या माध्यामातून भाडेतत्वावरील सेवा

सध्या हंसा सिटी बस सर्व्हिसेस प्रा. लि, मातेश्वरी कंपनी, डागा व एमपी ग्रुप अशा चार कंत्राटदाराच्या माध्यमातून या बसेस चालवण्यात येतात. मात्र कंत्राटी कामगारांना वेतन देणे परवडत नाही म्हणून एमपी ग्रुपने सेवा देणे बंद केले असून उर्वरित ३ कंत्राटदाराच्या माध्यमातून भाडेतत्वावरील बस चालवण्यात येतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here