मुंबई हे सर्वात व्यग्र शहर आहे. इथली लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावरही भार आहेच. अशा परिस्थितीत मुंबईतील रुग्णालये महत्वाची भूमिका बजावतात. अनेक सरकारी रुग्णालये रुग्णांना कमी पैशांत चांगले उपचार प्रदान करतात. मुंबईतील खाजगी रुग्णालये देखील जागतिक दर्जाची आहेत. इतर शहरांतून आणि राज्यातूनही उपचार घेण्यासाठी लोक मुंबईत येतात. आम्ही तुम्हाला या लेखात मुंबईतील काही सर्वोत्कृष्ट रुग्णालयांबद्दल सांगणार आहोत. (Best Hospital In Mumbai)
बॉम्बे हॉस्पिटल
हे रुग्णालय देशातील सर्वोत्कृष्ट बहु-वैशिष्ट्य असलेले जागतिक स्तरावरील वैद्यकीय रुग्णालय आहे. येथील डॉक्टर्स केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर जगभरात त्यांच्या स्पेशलायझेशनसाठी प्रसिद्ध आहेत. या रुग्णालयात देशभरातून रुग्ण येतात. यामध्ये मान्यवर देखील असतात. (Best Hospital In Mumbai)
नानावटी हॉस्पिटल
नानावटी हॉस्पिटल आपल्या हृदयासंबंधी उपचारासाठी ओळखले जाते. नानावटी हॉस्पिटल हे पश्चिम भारतातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. रुग्णाला जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी हे रुग्णालय आघाडीवर आहे. (Best Hospital In Mumbai)
ब्रीच कँडी हॉस्पिटल
बीकेसीमधील हे रुग्णालय दक्षिण मुंबईच्या अगदी मध्यभागी आहे. या रुग्णालयात जगभरातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. इथली आयसीयू सेवा अतिशय उत्कृष्ट आहे. अत्याधुनिक तांत्रिक सुविधा आणि ५० वर्षांहून अधिक कौशल्याचा इतिहास असलेले हे मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. (Best Hospital In Mumbai)
(हेही वाचा – Satwiksairaj & Chirag : थायलंड ओपन स्पर्धेत भारतीय दुहेरी जोडीसमोर आव्हान फॉर्मचं)
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड
इलेक्ट्रॉनिक आयसीयू सुरू करणारे भारतातील पहिले रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे फोर्टिस मुलुंडने अवघ्या चार वर्षांत १०० हून अधिक हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. (Best Hospital In Mumbai)
भाटिया हॉस्पिटल
हे मुंबईतील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयाची त्याची स्थापना १९३२ मध्ये झाली होती. स्थापनेपासून, या रुग्णालयाने सर्व नवीनतम आणि सर्वात प्रगत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना सर्वोच्च दर्जाची वैद्यकीय सेवा प्रदान केली आहे. तसेच या रुग्णालयाने आपल्या सेवांसाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. (Best Hospital In Mumbai)
जसलोक हॉस्पिटल
जसलोक हॉस्पिटल देखील मुंबईतील प्रसिद्ध आणि प्रशस्त रुग्णालय आहे. हे रुग्णालय IVF उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे जसलोक हॉस्पिटलने पश्चिम भारतातील पहिले BiVAD-सुविधायुक्त हृदय प्रत्यारोपण करण्याचा मान पटकावला आहे. (Best Hospital In Mumbai)
कोहिनूर हॉस्पिटल
अलीकडेच म्हणजे २००९ मध्ये स्थापन झालेले कोहिनूर रुग्णालय हे मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाले आहे. अगदी अल्प कालावधीत या रुग्णालयाने सर्वोच्च होण्याचा बहुमान पटकावला आहे. डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची एक समर्पित टीम रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय देण्याचा २४ तास प्रयत्न करीत असते. (Best Hospital In Mumbai)
सैफी हॉस्पिटल
अत्यंत प्रगत रोबोटिक सर्जिकल सिस्टीमने सुसज्ज असलेले सैफी हॉस्पिटल हे रुग्णांना सर्वोत्तम दर्जाची सेवा प्रदान करते. इथले कर्मचारी काळजी घेण्यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे रुग्णांना घरचं वातावरण मिळतं. म्हणूनच मुंबईतील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांमध्ये या रुग्णालयाला स्थान मिळाले आहे. (Best Hospital In Mumbai)
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
NABH-मान्यताप्राप्त रक्तपेढी हे लीलावती हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे, त्याचबरोबर कार्डिओलॉजी सेवांसाठी हे रुग्णालय ओळखले जाते. विशेष म्हणजे भारतातील टॉप २० रुग्णालयामध्ये स्थान मिळवून अभिमानाने उभे आहे. (Best Hospital In Mumbai)
पीडी हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर
पी.डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर हे जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपचार सेवा प्रदान करणारे राष्ट्रीय स्तरावर प्रशंसित रुग्णालय आहे. या रुग्णालयात संपूर्ण भारतातूनच नव्हे तर इतर देशांतूनही रुग्ण येतात आणि यशस्वी उपचार घेतात. ३८१ बेड्स, ५७ अतिदक्षता बेड्स असल्यामुळे हे रुग्णालय भारतातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. (Best Hospital In Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community