जाचक ड्युट्यांचे शेड्युल, चुकीचे काम वाटप अधिकाऱ्यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवणे यांसदर्भात गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कामगांरामध्ये प्रचंड असंतोष आहे. कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते परंतु तरीही यावर काही तोडगा न निघाल्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे शशांक राव, विठ्ठल गवस, नितीन पाटील, कागिनकर, गायकवाड, ज. म. कहार यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी आगार येथे १ ऑगस्टला संयुक्त द्वार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : “मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी”, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही- एकनाथ शिंदे)
द्वार सभेचे आयोजन
सेवा शर्तीमध्ये एकतर्फी बदल, जाचक ड्युटी शेड्युल, बेस्ट प्रशासनाचे मनमानी कामकाज, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवणे, वेतन सुधार प्रकरणाची माहिती, काम करताना कामगारांना होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मानसिक त्रास यामुळे कामगारांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे अशी कर्मचाऱ्यांची तक्रार असून यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता बेस्ट कृती समितीने १ ऑगस्टला दुपारी २.३० वाजता विक्रोळी आगारात द्वार सभेचे आयोजन केले आहे.
Join Our WhatsApp Community