बेस्टचे विलीनीकरण हा भाजपचा प्रमुख अजेंडा – नितेश राणे

बेस्ट कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष भाजप आमदार नितेशजी राणे यांनी बुधवारी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची भेट घेतली.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ AC डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार; बसची वैशिष्ट्य, तिकीट किती असेल?)

मागण्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूदीची गरज

बेस्टच्या कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूदीची गरज आहे. यासाठी ६००० कोटीची तूट बेस्टला आहे ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट लवकरच नितेश राणे घेणार आहे, त्याबरोबरच बेस्ट विलीनीकरण हा भाजपचा प्रमुख अजेंडा असल्याने त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले. याप्रसंगी बेस्ट कमिटी सदस्य राजेश हटले, उपाध्यक्ष विलास पवार, प्रकाश राणे, राजेंद्र दळी, विवेक शिर्सेकर, दीपक पाटील, शंकर पवार, राजन राणे, शामसुंदर राणे, दिनेश गावस्कर,संगीता पुरम उपस्थित होते.

 

दरम्यान येत्या ७ ऑगस्टला बेस्टला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने अमृत महोत्सवी वर्षात बेस्ट उपक्रमाने फक्त एका रुपयांत बेस्ट आजादी योजना जाहीर केली आहे. ( अमृत महोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सवलती) ज्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येईल. सदर सवलत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here