बेस्ट आगारातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ बेस्ट कमिटी सदस्य सुनिल गणाचार्य यांनी विविध बेस्ट आगारांमध्ये भेट दिली. घाटकोपर, प्रतीक्षा नगर, आणिक, वडाळा आगार येथे प्रत्यक्ष आगारामध्ये जाऊन कामगारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेऊन गणाचार्य यांनी आगार अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कर्मचारी व इतर डेपोचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिल गणाचार्य यांच्याकडे जाचक शिफ्ट, चुकीचे काम वाटप, अधिकाऱ्यांची मनमानी याबद्दल तक्रारी केल्या.
जाचक ड्युटी शेड्युल रद्द करण्यासाठी
कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट कमी तासांची व दुसरी शिफ्ट जास्त तास, चुकीचे काम वाटप व अधिकाऱ्यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवण्यात आल्या. काम करताना कामगारांना होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मानसिक त्रास यामुळे कामगारांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे अशी कर्मचाऱ्यांची तक्रार होती आणि यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. कर्मचाऱ्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सर्व समस्यांचे लेखी अर्ज त्यावर कामगारांच्या सह्या घेऊन आगारातील भाजप पदाधिकारी व कामगार यांनी सोमवार दिनांक २७ जून २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता कुलाबा आगार येथे हजर रहावे असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. यावेळी कामगार नेते सुनिल गणाचार्य हे बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची कुलाबा बेस्ट भवन येथे भेट घेणार आहेत.
Join Our WhatsApp Community