मुंबई बेस्ट परिवहन उपक्रमाने १ हजार ४०० इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेतून चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले म्हणून टाटा मोटर्सने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच बेस्टच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती सुद्धा टाटा मोटर्सने केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने परिवहन उपक्रमाला अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
( हेही वाचा : काय सांगता? सरकार देणार घरपोच आंबे ‘या’ संकेतस्थळावरून करा ऑर्डर! )
निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची टाटा मोटर्सची विनंती
बेस्टने सार्वजनिक वाहतुकीसाठी १ हजार ४०० सिंगल डेकर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी २६ फेब्रुवारी रोजी ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली होती. टाटा मोटर्सने २५ एप्रिलला आपली तांत्रिक आणि आर्थिक बोली सादर केली होती असे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. परंतु बेस्टने तांत्रिक अनुकूलता मूल्यांकन जाहीर करत आमची निविदा वगळली. चुकीच्या पद्धतीने व चुकीचे निकष लावून हा निर्णय घेण्यात आला आहे असे दावा टाटा मोटर्सने याचिकेमार्फत केला आहे. तसेच या निविदा प्रक्रियेला स्थगिती द्या अशी मागणीही टाटा मोटर्सने केली आहे.
या प्रकरणी २३ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community