बेस्टच्या बॅकबे आणि कुर्ला आगार येथील उपहारगृहे गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे असे पत्र बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी महाव्यवस्थापकांना दिले आहे.
( हेही वाचा : धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! ‘या’ गाड्या विलंबाने, प्रवाशांची गैरसोय)
उपहारगृहे बंद; कर्मचाऱ्यांची गैरसोय
मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स कायदा आणि कारखाना कायद्यानुसार या दोन्ही आस्थापनांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगारांसाठी उपहारगृह चालविणे ही बेस्ट उपक्रमाची कायदेशीर जबाबदारी आहे. उपहारगृह बंद असल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनने महाव्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे कामगारांचे हाल होऊ नयेत या उद्देशाने आपण दोन्ही उपहारगृहे तातडीने सुरू करून कामगारांची सोय करावी अशी विनंती बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाला केली आहे.
दरम्यान, डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मुंबई दर्शनासाठी बेस्ट दुमजली खुली बस चालवण्यात आली. या सेवेतून २ लाख ३९ हजार ९५० रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.