बेस्ट कला व क्रीडा विभाग आयोजित आंतरआगार टेबल टेनिस स्पर्धेत नितीन वालावलकर, निलेश जानवलेकर, सुनिल यादव, स्टॅनी अँथोनी यांनी पुरुष एकेरी व पुरुष दुहेरी गटात विजय मिळवला.
( हेही वाचा : १० वी उत्तीर्णांना टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! ४०५ रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज )
नितीन वालावलकर यांनी सलग चौथ्यांदा पुरुष एकेरीत विजेतेपद त्याचप्रमाणे पदार्पणातील दोन वर्षातच निलेश जानवलेकर यांनी स्पर्धेतील तगड्या स्पर्धकांना आव्हान देत विभागीय दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सुनिल यादव आणि स्टॅनी अँथोनी यांच्या उत्तम कामगिरीबद्दल बेस्टच्या टेनिस संघात त्यांची निवड करण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या भारती धामणकर यांनी ‘अ’ गट रांगोळी स्पर्धेत व समूह गायन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळविले आणि सुप्रिया जगदाळे यांना गायनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख चंदाराणी जगदाळे यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे कौतुक करत क्रीडा व कलेत सातत्य राखण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विभागातील सर्व यशस्वी स्पर्धकांचा गौरव करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहायक प्रशासकीय व्यवस्थापक अरुण कंथारीया यांनी कार्यक्रमाचे नियोजन करत कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी समस्त बेस्ट परिवाराकडून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.