बेस्ट युनियनची सभासद नोंदणी ऑनलाईन स्वरूपात होणार; कालावधी १५ दिवस पुढे

168

समर्थ बेस्ट कामगार संघटनेची सप्टेंबर महिन्यात होणारी नवीन सभासद नोंदणी गणेशोत्सवानिमित्त पुढे ढकलावी अशी विनंती समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना केली आहे. यावेळी बेस्ट कामगारांची थकित देणी दिल्याबद्दल महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांचे पदाधिकारी विलास पवार, राजन राणे, दिपक पाटील, गुरुनाथ महाडेश्वर, मंगेश मयेकर, नागेश गोरे यांनी आभार मानले. तसेच नवीन सभासद नोंदणी ऑनलाईन स्वरूपात होईल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सभासद नोंदणी कालावधी १५ दिवस पुढे

बेस्ट मध्ये सर्व युनियनच्या नवीन सभासद नोंदणीचा व रद्दबातल करण्याचा कार्यक्रम यापूर्वी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत होता परंतु गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी कालावधी आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आला असून आता नोंदणी कामगारांना सोयीस्कर व्हावे म्हणून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावयाचा आहे, असे आवाहन नितेश राणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. आपल्या देशात व राज्यातही आता भाजपचे सरकार कार्यरत आहे, त्यामुळे भविष्यात आपल्यालाच चांगल्या संधी मिळणार आहेत. आपण बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन बेस्ट कामगारांच्या समस्या मांडल्या. त्यानंतरच बेस्टची थकीत देणी देण्यास प्रशासनामार्फत सुरुवात करण्यात आली.

New Project 86

आपण सर्वांनी आपल्या सभासदांना बेस्टमधील अन्य युनियनचे सभासदत्व असल्यास ते रद्द करून आपल्या युनियनचे सभासद अर्ज भरून घ्यावयाचा आहे आणि जास्तीत जास्त कामगारांना सभासद करून घ्यायचे आवाहन नितेश राणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. लवकरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत आपली एक जाहीर बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.